* शुभा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
आर्य वैश्य समाज, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय कौतुक सोहळा रविवारी (दि.६) संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला. या कौतुक सोहळ्यात माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, सामाजिक अभ्यासक सपना मुनगंटीवार, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सचिव राहुल रेकावार यांना आर्य वैश्य मंडळ, छत्रपती संभाजीनगरचे कार्याध्यक्ष भास्करराव चौधरी, मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुरेश रुद्रवार यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून गुणवंतांच्या राज्यस्तरीय कौतुक सोहळ्याला प्रारंभ झाला. राज्यभरातून आलेल्या आर्य वैश्य समाजाच्या १५३ गुणवंतांचे कौतुक राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, सामाजिक
जगर
अभ्यासक सपना मुनगंटीवार, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महाराष्ट्रचे सचिव राहुल रेकावार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाण पत्र देवून करण्यात आले. प्रास्ताविक मंडळाचे सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांनी केले. आभार मंडळाचे सह-सचिव प्रशांत अमिलकंठवार यांनी मानले. तर सूत्रसंचलन प्रेषित रुद्रवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, बालाजी येरावार, आशीष कोडगिरे, अनिल कौलवार, प्रेषित रुद्रवार, महेश बसेटवार, राजेश येरावार, सुरेश कमटलवार, राजेश चालीकवार, महेश चिद्रावार, विनय पाटील, प्रशांत गादेवार, आशीष लाभसेटवार, गोविंद केशवशेट्टी, गजानन गुंडावार, अनिल डूब्बेवार, बालाजी पांपटवार, ज्ञानेश्वर तगडपल्लेवार, अजय महाजन, प्रशांत अमिलकंठवार, नरेश ऱ्याकावार, प्रथमेश उत्तरवार आदींनी विशेष प्रयत्न केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












